करोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असतानाच केंद्रीय अर्थमंत्री यांनी सहा लाख २९ हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. करोनाचा फटका बसलेल्या आरोग्य सेवा, कृषी, निर्यात, पर्यटन, कारखाना उत्पादन, उर्जा क्षेत्राला या पॅकेजचा लाभ होणार असल्याची चर्चा आहे. केंद्र सरकारच्या या पॅकेजवर संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया दिली. ‘केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या पॅकेजमुळं लोकांच्या मनात उत्साह किंवा आनंद दिसत नाही. २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजचं काय झालं हे अद्याप कळलेलं नाही. आता उद्योग क्षेत्रासाठी किंवा करोनाबाधित क्षेत्रांसाठी पॅकेज दिलं गेलंय. पण ह्यानं लोकांचा प्रश्न सुटणार आहे का? लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. याबाबत कुठलीही स्पष्टता नाही. सरकारची काहीच भूमिका दिसत नाही,’ असं राऊत म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार स्थिर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीवरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ‘दोन मोठ्या नेत्यांची भेट झाली आहे. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली आहे. माझीही पवार साहेबांशी चर्चा झाली आहे. विरोधक केवळ संभ्रम पसरवत आहेत. सरकारला कुठलाही धोका नाही, सरकार स्थिर आहे,’ असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
आणखी वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times