अकोला : अकोला जिल्ह्यातल्या मुर्तिजापूर येथून जवळच असलेल्या समशेरपूर येथे एका 35 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. धम्मपाल आटोटे असे युवकाचे नाव असून आज सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

धम्मपाल उर्फ आदेश महादेव आटोटे हा सामाजिक कार्यकर्ता होता. तो औरंगाबाद येथे वास्तव्यास होता. मूर्तिजापूर येथील प्रतीक नगरमध्ये राहणारा 55 वर्षीय आरोपी दिपकराज डोंगरे हा 29 तारखेपासून धम्मपाल याच्या मार्गावरच होता. धम्मपाल तो भाच्याच्या लग्नासाठी 29 जून रोजी आपल्या गावी आला असता मूर्तिजापूर इथे आला असता त्याची हत्या करण्यात आली आहे. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला असून मृतकाचा भाऊ हा किरकोळ जखमी झाला आहे.

30 जून रोजी दिपकराज डोंगरे याने धम्मपाल याला घरीच समशेरपूर येथे गाठून त्याच्या पोटात चाकूने व कोयत्याने सपासप वार केले. यात धम्मपाल याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतकाचा मोठा भाऊ भांडण सोडवण्यासाठी गेला असता दोघांनमध्ये वाद झाले आणि त्यात त्याच्या उजव्या हातावर चाकू लागल्याने तो जखमी झाला.

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी दिपकराज डोंगरे हादेखील गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी अकोला इथे पाठविण्यात आले होते. मात्र, त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here