मुंबई: मुंबईत कालच्या तुलनेच नव्या बाधित रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत ६९२ इतक्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ५६२ इतकी होती. तर, आज दिवसभरात ६८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज दिवसभरात एकूण २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबर आतापर्यंत एकूण १५ हजार ४५१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मुंबईत ज्यांवर उपचार सुरू आहेत अशा सक्रिय रुग्णांची संख्या ८ हजार ३५१ इतकी आहे. मुंबई महानगरपालिकेने ही माहिती दिली आहे. (mumbai registered 608 new covid cases with 714 patients recovered and 18 deaths )

मुंबईचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ टक्क्यांवरच असून रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल ७१६ दिवसांवर गेला आहे. मुंबईत आज करोनाच्या ३८ हजार ०७८ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईतील झोपडपट्टी विभाग आणि चाळींमध्ये सध्या ११ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर पाच पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या ८० इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

मुंबईतील करोनाची आजची स्थिती

२४ तासांत बाधित रुग्ण – ६९२
२४ तासांत बरे झालेले रुग्ण – ६८०
बरे झालेले एकूण रुग्ण – ६९६१०५
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%
एकूण सक्रिय रुग्ण- ८३५१
रुग्ण दुप्पटीचा दर- ७१६ दिवस
कोविड वाढीचा दर ( २३ जून ते २९ जून)- ०.०९ %

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here