वाचा:
पोलीस निरिक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी नगरनाका येथे छावणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी नाकाबंदीच्या कर्तव्यावर तैनात होते. यावेळी छावणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पांडुरंग भागिले, जमादार टाक व इतर कर्मचारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नगरनाका चौकात उपस्थित होते. या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवरही कारवाई सुरू होती. एका चारचाकी वाहनातून गणेश भुमे हा विनामास्क जात असल्याचे निदर्शनास आल्यावर पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली. तेव्हा या तरुणाने नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. या झटापटीत सहायक निरीक्षक भागिले यांच्या नाकाला आणि तोंडाला मार लागला असून, जमादार टाक यांच्या अंगावरील कपडे फाडले गेले आहेत.
वाचा:
या घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, निकेश खाटमोडे, छावणी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ, छावणीचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या मारहाण प्रकरणात गणेश भुमे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
मारहाण करणारा एनएसजी कमांडो
गणेश गोपीनाथ भुमे (३४, रा. दिल्ली, ह.मु. फुलंब्री) याने नगरनाका येथे पोलिसांना मारहाण केली असून अधिक चौकशी गणेश हा लष्करी जवान असल्याची माहिती समोर आली आहे. तो दिल्ली येथे एनएसजी सेंट्रल आर्म पोलीस फोर्स येथे कार्यरत असल्याचे समजते. ज्या गाडीतून हा जवान प्रवास करित होता. त्या गाडीवरही एनएसजी कमांडो असे लिहिलेले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times