चाळीसगाव: भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वारासह चौघांचा मृत्यू झाला तर तीन वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. जिल्ह्यातील चाळीसगाव- नांदगाव रस्त्यावर रोहिणी ते तळेगाव दरम्यान बुधवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात एकाच कुटुंबांतील तिघांचा मृत्यू झाला असून त्यात एक गर्भवती महिला व ८ वर्षीय बालिकेचा समावेश आहे. मृतापैकी एक जण तालुक्यातील येथील तसेच अन्य तिघे तांदुळवाडी (ता. कन्नड) येथील रहिवासी आहेत. ( )

वाचा:

वाघडू येथील (वय ३५) यांच्या शेतात तांदुळवाडी येथील विलास वसंत मोरे, पत्नी अल्काबाई, मुलगी रेणुका (वय ८) व मुलगा अमोल (वय ३) असे कुटुंब वास्तव्यास होते. परिसरात शेतमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह भागवित असत. मोरे यांच्या पत्नी अल्काबाई ह्या गर्भवती असल्याने तिला गावी तांदुळवाडी येथे सोडण्यासाठी ते सकाळी ११ वाजता वाघडू येथून निघाले होते.

वाचा:

भगवान पाटील हे त्यांच्या (एम.एच.०२ ईबी ६४७६) या दुचाकीने विलास मोरे, अल्काबाई, रेणुका व अमोल यांना घेऊन तांदुळवाडीकडे जात होते. दरम्यान, सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर रोहिणी ते तळेगाव दरम्यान रोहिणी गावाजवळ या दुचाकीची नांदगावकडून चाळीसगावकडे येणाऱ्या कारशी (क्र. एम.एच. २२ बी.जे. ७१३४) समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार काही फूट हवेत उडाला तर कार रस्त्यावरून थेट शेतात शिरली. या अपघातात भगवान पाटील व हे दोघे जागीच ठार झाले तर अल्काबाई व रेणुकाचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तीन वर्षीय अमोल हा चेहऱ्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

वाचा:

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलाला ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. अपघातात कार चालकही जबर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दुपारपर्यंत मृतांची ओळख पटली नव्हती. सायकांळी मृताच्या नातेवाईकांशी संपर्क झाल्यानंतर ओळख पटली. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक संपत आहेर, हवालदार भालचंद्र पाटील, शांतीलाल पगारे, नितिन अमोदकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाघडू येथील पोलीस पाटील व ग्रामस्थांनीही सहकार्य केले. याप्रकरणी कार चालकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here