वाचा:
एकनाथ निमगडे व रणजीत सफेलकर याने घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीवास हत्याकांडात गुन्हेशाखा पोलिसांनी सफेलकर व त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. सफेलकर टोळी विरुद्ध मोक्कांतर्गत कारवाईही करण्यात आली आहे. त्यानंतर सफेलकर याच्याविरुद्ध खून, खंडणी, अग्निशस्त्र बाळगणे आदींसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून पोलीस आयुक्त अमितेशकुमार, गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त यांनी सफेलकर याच्या संघटनेची मान्यता रद्द करण्याबाबत धर्मादाय आयुक्तांना पत्र पाठविले होते. सोबत सफेलकर याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहितीही जोडली. त्याआधारावर कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. धर्मादाय आयुक्तांनी रणजीत सफेलकरच्या संघटनेची मान्यता रद्द असून तशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
वाचा:
दरम्यान, २८ एप्रिल रोजी राजमाने यांच्या नेतृत्वात कामठी नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सफेलकर याचे राजमहाल नावाचे लॉन व सभागृह भुईसपाट केले आहे. सफेलकर हा तीन संस्थांमार्फत संचालित सात शाळांचा अध्यक्षही होता. ही बाब गुन्हेशाखेने उघडकीस आणल्यानंतर त्याची या संस्थेच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times