पुणे: शिवजयंती साजरी करण्यासाठी जुन्नरजवळील हडसर किल्ल्यावर गेलेल्या ठाण्यातील तरुणीचा पाय घसरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, बुधवारी सकाळी ११.३० ते १२ वाजताच्या सुमारास घडली. सिद्धी कामठे (वय २०) असं मृत तरुणीचं नाव आहे.

मुंबई-ठाण्यातील एक गट शिवजयंती साजरी करण्यासाठी जुन्नरजवळ असलेल्या हडसर किल्ल्यावर गेला होता. त्यांच्यासोबत ठाण्यातील सिद्धी कामठे देखील होती. सकाळी ११.३० ते १२ च्या सुमारास हडसर येथे कुटीची वाट येथे सिद्धीचा पाय घसरला आणि ती साडेचारशे फूट खोल दरीत पडली. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले. पुण्यातील आपत्ती व्यवस्थापन संघाचे रमेशभाऊ खरमाळे, सागर जाबरे, मंदार सन्नाक आणि स्थानिक पोलीस पाटील आणि ग्रामस्थांच्या मदतीनं तिला दरीतून बाहेर काढलं. त्यानंतर येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांची या घटनेची माहिती मृत तरुणीच्या कुटुंबीयांना दिली आहे. तिचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here