मुंबई: ‘करोना, आर्थिक संकट, बेरोजगारी, निसर्गाच्या संकटाशी सामना सुरू असतानाच ‘’ किंवा सीबीआयचं संकट सुल्तानी पद्धतीनं कोसळलं आहे. महाराष्ट्राचं सरकार कुरुक्षेत्राच्या मध्यभागीच उभे असून श्रीकृष्णाच्या रथाप्रमाणे सगळे बाण व हल्ले पचवत विरोधकांशी लढत आहे. त्यामुळं सरकारला काहीही होणार नाही. विरोधकांनी स्वतःचा अभिमन्यू हेऊ देऊ नये,’ असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे. ( in Editorial for misuse of ED and CBI)

‘ईडी’च्या छाप्यांमुळं राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यासह तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या स्वतंत्र बैठका सुरू आहेत. त्यामुळं सरकारी पातळीवर काही घडतंय की काय, अशी एक चर्चा आहे. या सगळ्या घडामोडींवर ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. ‘ईडी, किंवा आपले महामहीम राज्यपाल महोदय यांचा वापर करून राज्यातील सरकार अस्थिर होईल हा भ्रमाचा भोपळाच आहे. ममता बॅनर्जी यांनी या सुल्तानशाहीशी लढून विजय मिळविला. महाराष्ट्रानेही तोच मार्ग स्वीकारणे गरजेचे आहे. मंगळवारी झालेल्या पवार-ठाकरे चर्चेतही लढाईचा आराखडा ठरलाच असेल,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचा:

‘महाराष्ट्रानं उगाच दिल्लीशी भांडण करण्याचीही गरज नाही. महाराष्ट्र दिल्लीशी झगडा करतो तेव्हा दिल्लीस शरण यावं लागतं हा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात नेहरूंशी भांडण करूनच मुंबई महाराष्ट्रास मिळाली. महाराष्ट्राचं भांडण हे विचारांचं, तत्त्वांचं व राष्ट्रासाठी असतं. त्याच महाराष्ट्र धर्माचं पालन करत आहे,’ असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

भाजप नेत्यांना टोला

‘उद्धव ठाकरे व पंतप्रधान मोदी यांच्यात मध्यंतरी झालेल्या भेटीत महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनाचीच बातचित झाली व आता पुन्हा एकदा राजभवनात पहाटेची लगबग सुरू होईल असं स्वप्न कुणाला पडत असेल तर ते दिवास्वप्न आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी व्यक्तिगत चर्चा केली हे काही दीर्घद्वेषी मंडळींना आवडले नाही. महाराष्ट्रानं दिल्लीशी सतत भांडत राहावं. मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्यात सदैव आदळआपट सुरू राहावी असं त्यांना वाटत असावं. मुख्यमंत्री ठाकरे हे आमच्या मध्यस्थीशिवाय मोदींना भेटतातच कसे? असं वाटलं असावं. पण मोदींनी ठाकरे यांना भेटण्यासाठी इतका वैयक्तिक वेळ का दिला, हा प्रश्न त्यांनी मोदींना विचारला तर त्यावर उत्तर आणि औषध दोन्ही मिळेल. पवारही अधूनमधून मोदी यांना भेटत असतात आणि बोलत असतात. पंतप्रधानांशी संवाद ठेवण्यासाठी मधल्या अडत्यांची गरज नाही,’ असं शिवसेनेनं सुनावलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here