वाचा:
राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र राजकीय उद्देश ठेवून लिहिण्यात आलं आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी २३ जून रोजी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना दोन निवेदनं दिली होती. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी वाढवावा. विधानसभा अध्यक्षांची लवकरात लवकर निवड करावी. तसंच, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती द्यावी, अशा मागण्या फडणवीसांनी राज्यपालांकडं केल्या होत्या.
वाचा:
फडणवीसांच्या या मागण्याची दखल घेऊन राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील फडणवीसांच्या मागणीवर कार्यवाही करण्याच्या राज्यपालांच्या सूचनेला राष्ट्रवादीनं आक्षेप घेतला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही. ओबीसी आरक्षणाचा सध्याचा तिढा सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळं निर्माण झाला आहे, राज्याच्या निर्णयामुळे नाही, हे त्यांना माहीत असायला हवं होतं, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times