मुंबई : आज राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे. या दिनानिमित्त राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या संकटात आपल्या जिवाची पर्वा न करता मोठ्या हिमतीने लढा देणाऱ्या सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहेत. यासाठी त्यांनी एक पत्र लिहित सर्व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. इतकंच नाहीतर त्यांना धन्यवाद देऊन दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करत असल्याचे राजेश टोपे यांनी पत्रात म्हटले आहे.

खरंतर, करोनाच्या या भीषण काळात डॉक्टरांनी दिवस-रात्र एक करत काम केलं. या संसर्गाला हरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था पणाला लागली होती. पण तरीही डॉक्टरांनी धीर न सोडता मोठ्या हिमतीने आपलं काम केलं. संसर्ग वेगाने फैलावत असतानाही डॉक्टरांनी आपल्या कुटुंबाचीही काळजी न करता दिवस रात्र फक्त रुग्णांच्या सेवेत घालवले. त्यामुळे आज राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त या सर्व डॉक्टरांना राजेश टोपे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

राजेश टोपे यांनी पत्रात लिहिलं की, ‘राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविताना संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज राज्याचा रिकव्हरी रेट ९६ टक्‍क्‍यांवर गेला आहे. या कामी डॉक्टर्स व त्यांच्या जोडीला असलेले नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांचा मोठा वाटा आहे. आजच्या डॉक्टर दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व डॉक्टरांना मी पुन्हा एकदा खूप सार्‍या शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here