अहमदनगर: महापालिकेत राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येत सत्ता स्थापन करताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस एकाकी पडला. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेसने आता महापालिकेच्या मागील सत्तेच्या कारभाराविषयी श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. पूर्वी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपची सत्ता होती. त्यांच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात विकासाच्या केलेल्या दाव्याला आव्हान देत शहरामध्ये रखडलेल्या कामांची जंत्री मांडत श्‍वेतपत्रिका प्रकाशित केली आहे.

महापौरपदी शिवसेनेच्या तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे यांची बिनविरोध निवड झाली. सर्वप्रथम उमेदवार जाहीर केलेल्या काँग्रेसला मात्र उमेदवारी अर्ज न भरताच माघार घ्यावी लागली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यालयात या श्वेतपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

वाचा:

श्वेतपत्रिकेसंबंधी भूमिका मांडताना किरण काळे म्हणाले, ‘श्‍वेतपत्रिका म्हणजे एखाद्या गोष्टीची खरी स्थिती मांडणे असे आहे. जगामध्ये अनेक देश अशा पद्धतीने जनतेला वस्तुस्थिती समजावी यासाठी सरकारच्या वतीने ती प्रकाशित करत असतात. आम्ही काँग्रेसच्या वतीने नगर शहरातील खऱ्या स्थितीबद्दल महानगरपालिका व नागरिकांचे आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी ही श्वेतपत्रिका प्रकाशित केली आहे. , राष्ट्रवादीची शहरातील ‘सहमती एक्सप्रेस’ ही शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर नसून काही नेत्यांच्या वैयक्तिक राजकीय स्वार्थापोटी होती. नगरची जनता अशा प्रकारच्या एक्सप्रेसला विकासाच्या नावाच्या गाजराला बळी पडेल असा गैरसमज काही नेत्यांचा झाला आहे.’

वाचा:

श्वेतपत्रिकेत शहराच्या दुरावस्थेचे नागरी प्रश्नांसंबंधी मुद्दे उपस्थित केले आहेत. शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे, भुयारी गटार योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, अमृत पाणी योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही, नागरिकांना आजही दिवसाआड पाणी मिळते आणि अनेक ठिकाणी हेच प्रमाण तीन ते चार दिवसांचे आहे, अजूनही घंटागाड्या शहराच्या सर्व भागांमध्ये पोहोचत नाहीत, पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामे झालेली नाहीत, हॉकर्स झोन, फेरीवाला संरक्षण कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही, सावेडीतील नाट्यगृहाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणारी सिटीबसची दैना पाहता नगरकरांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा यातून देण्यामध्ये मनपा सपशेल फेल ठरली आहे, असे मुद्दे मांडण्यात आले आहेत. यापुढील काळात शहरात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष अधिक टोकदार होण्याची चिन्हे यातून दिसून येत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here