बुलडाणा: देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं काही दिवसांपूर्वी वादात अडकलेले बुलडाण्याचे शिवसेना आमदार पुन्हा चर्चेत आले आहेत. अॅट्रॉसिटीच्या संदर्भात वक्तव्य केल्याचा त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. गृहराज्यमंत्र्यांचा थेट नामोल्लेखही गायकवाड यांनी व्हिडिओत केला आहे. (Shiv Sena MLA comment against atrocity sparks row)

तालुक्यातील चितोडा अंबिकापूर या गावातील वाघ व हिवराळे कुटुंबामध्ये दहा दिवसांपूर्वी वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की त्यांच्यात हाणामारी झाली. घराची व वाहनांची तोडफोड करण्यात आली. यात दोन्हीकडचे लोक जखमी झाले. या प्रकरणानंतर संजय गायकवाड यांनी शेकडो समर्थकांसह वाघ कुटुंबाची भेट घेतली व त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर तेथील गावकऱ्यांशी बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं.

वाचा:

‘मातोश्रीवरून मला फोन आलाय म्हणून मी पीडित कुटुंबांना धीर देण्यासाठी आलोय. गरज भासल्यास शस्त्रास्त्रांसह दहा हजार कार्यकर्त्यांची फौज घेऊन तुमच्या पाठीशी उभा राहीन. कुणावर अन्याय करू नका, पण अन्याय केला तर शांत राहू नका. अॅट्रॉसिटी हा कायदा संरक्षणासाठी आहे. पण या गावात कायद्याचा गैरवापर केला जातोय. ब्लॅकमेलिंग केलं जातंय. त्यामुळं यापुढं कुणी अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करत असेल तर तुम्ही सुद्धा चोरीचे गुन्हे दाखल करा. अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात दोन दिवसांत जामीन होऊन जाईल, पण चोरीच्या गुन्ह्यात तीन महिन्यांनी सुद्धा यांना जामीन मिळणार नाही. कोणता ठाणेदार गुन्हा दाखल करत नाही ते आम्ही बघून घेऊ,’ असं ते म्हणाले. गृहराज्यमंत्र्यांचा स्पष्ट नामोउल्लेखही त्यांनी यावेळी केला.

वाचा:

गायकवाड यांच्यानंतर ऑल इंडिया दलित पँथर सेनेचे संयोजक दीपक केदारे यांनीही गावाला भेट देऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे सामाजिक तेढ निर्माण करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. स्थानिक खासदारांवरही त्यांनी गंभीर आरोप केले. आमदार संजय गायकवाड यांना त्यांनी थेट आव्हानही दिलं.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here