लोणावळा : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर एका कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून तीन वाहनांचा (Mumbai Pune Expressway Accident Today) झाला आहे. या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे. खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट ते फुडमॉल दरम्यानच्या तीव्र उतारावर ही दुर्घटना घडली.

अपघातानंतर कारला आग लागून जळून खाक झाली आहे. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. हा अपघात आज गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला आहे.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कंटेनर चालकाचे खोपोली एक्झिट ते फुडमॉल दरम्यानच्या किलोमीटर क्रमांक ३७ येथील तीव्र उतार व वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे कंटेनर एका ट्रकवर मागून जोरात धडकला, तर त्या ट्रकची पुढे जाणाऱ्या एका आयटेन कारला जोरात धडक बसून भीषण अपघात झाला.

अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये आई, ‌वडील व मुलाचा समावेश आहे. या भीषण अपघातामुळे तिन्ही वाहने मार्गावर पलटली. तसंच कारला आग लागलेल्या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट (दस्तुरी) महामार्ग सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश परदेशी यांचे सहकारी, खोपोली पोलिस, देवदूत आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेची पाहणी करुन पोलिसांनी आयआरबीआय कंपनीच्या कामगारांच्या मदतीने व क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढत, आग लागलेल्या कारला अग्निशमन बंबाच्या सहाय्याने विझविण्यात आलं. त्यानंतर कार बाजूला काढून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलिस करीत असून, अपघातातील मृतांची नावे अद्याप समजली नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here