नागपूर: मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यावर सत्ताधारी पक्षांप्रमाणेच विरोधी पक्षातील नेतेही प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने आता वेळकाढूपणाची भूमिका न घेता न्यायमूर्ती भोसले यांनी केलेल्या सूचनांवर तत्काळ काम करावे, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला केले आहे. (opposition leader devendra fadnavis gives reaction after supreme court rejects review petition)

देवेंद्र फडणवीस हे नागपुरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबतची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, ज्या वेळेस केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली, त्याच वेळेस पुनर्विचार याचिकेला फार कमी स्कोप असतो असे मी म्हटले होते. न्यायमूर्ती भोसले समितीने दिलेल्या निर्णयात स्पष्टपणे म्हटले आहे की याचिकेला मर्यादा असतात. हे सगळे प्रकरण पुन्हा एकदा मागासवर्ग आयोगाकडे पाठवले पाहिजे आणि मागे राहिलेल्या त्रुटी दूर कराव्यात, अशा सूचना न्यायमूर्ती भोसले समितीने केल्या आहेत. आता सरकारने अधिक वेळ न दवडता न्यायमूर्ती भोसले समितीने सांगितल्याप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत तत्काळ कारवाई करावी.

क्लिक करा आणि वाचा-

सरकार वेळकाढूपणाचे धोरण

यावेळी फडणवीस यांनी सरकार मराठा आरक्षणाच्या प्रकरणी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत असल्याची टीका केली आहे. मराठा समाजाचे आरक्षण टिकावे यासाठी महाविका आघाडी सरकार कोणतीही कारवाई करत नाही, असेही फडणवीस म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
हा मार्ग लांबचा आहे शॉर्टकट नाही, याची मला देखील कल्पना आहे. मात्र, आपण योग्य निर्णय जर घेतलाच नाही तर हा कार्यकाळ आणखी १० वर्षे चालेल. हे लक्षात घेऊन न्यायमूर्ती भोसले समितीने जे सांगितले आहे त्या प्रमाणे त्यावर कारवाई करावी अशी आमची सरकारडून अपेक्षा आहे, असेही फडणवीस शेवटी म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here