: अर्धापूर शहरात एका जिममध्ये बुधवारी रात्री वेगवेगळ्या धर्मातील काही युवकांमध्ये झालेल्या किरकोळ वादावरून शहरामध्ये तुफान दगडफेक झाली. सदरील जिमचे नाव आर. के. जिम असून जिममध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर शहरातील मारोती मंदिर चौकात दोन गटात तुफान दगडफेक झाली. यावेळी पोलिसांच्या गाड्यांसह मोठ्या प्रमाणात चार चाकी व दोन चाकी वाहनाचे नुकसान झालं आहे. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना अक्षरशः अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

पोलिसांनी दोन्ही गटातील तब्बल अडीचशे जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यातल्या १८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सध्या अर्धापूर इथं तणावपूर्ण शांतता आहे.

याप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी म्हणाले की, ‘या प्रकरणात गुन्हेगारांना पाठिशी घालणार नाही. अर्धापूर दगडफेक प्रकरणात सखोल चौकशी करून योग्य ती कडक कार्यवाही केली जाईल.’

दरम्यान, या प्रकरणी आता कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. सध्या शहरात सर्वत्र शांतता आहे. शहरातील नागरिकांनी आपापली नियमित कामे सुरू करावीत. या प्रकरणी कोणीही कसल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही अडचण असेल तर थेट पोलिसांशी संपर्क साधावा’, असं आवाहन पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here