वाचा:
सातारा व सांगली या दोन जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीत अनेक मोठ्या नेत्यांनी लक्ष घातलं होतं. सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला यांच्या रयत पॅनेल आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलनं आव्हान दिलं होतं. या निवडणुकीत ३४,५३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. निवडणुकीच्या निमित्तानं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आलं नाही. त्याचा व्हायचा तोच परिणा झाला. सत्ताधारी जयवंतराव भोसले पॅनेलनं निर्विवाद वर्चस्व राखत २१ पैकी २१ जागा जिंकल्या. विरोधी आघाडीच्या पॅनेलला भोपळाही फोडता आला नाही.
अतुल भोसले म्हणतात…
कृष्णा सहकारी साखर कारखान्यात राजकारण आणण्याचं अनेकांचं षडयंत्र होतं. मात्र, सूज्ञ सभासदांनी त्यांचा डाव उधळून लावला असून यापुढील काळात शेतकरी सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम केलं जाईल, अशी प्रतिक्रिया सत्ताधारी सहकार पॅनलचे प्रमुख व चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times