संवाद दौऱ्यासाठी जामखेडमार्गे बीडला जाताना संभाजीराजे काही वेळ अहमदनगर शहरात थांबले होते. येथील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची फेरविचार याचिका फेटाळून लावली आहे. या पार्श्वभूमीवर आता पुढील लढ्यासंबंधी त्यांनी येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली.
दरम्यान, कालच विखे पाटील यांनी सारथी संस्थेसंबंधी वक्तव्य केले होते. यासंबंधी विचारले असता संभाजीराजे म्हणाले, विखे हे मोठे नेते आहेत. आमच्यापेक्षा त्यांना आरक्षणाबद्दल जास्त माहिती असेल. मला आनंद आहे की ते आता आरक्षणावर बोलायला लागले आहेत. मात्र, त्यांनी त्यांच्या पद्धतीने लढा सुरू ठेवावा. मात्र, आम्हाला त्यांनी शिकवू नये. आम्ही २००७ पासून या कामात आहोत. ते आता बोलायला लागले आहेत.’ असे संभाजीराजे म्हणाले.
वाचाः
काल एका पत्रकार परिषदेत बोलताना विखे म्हणाले होते. ‘सरकारमध्ये आरक्षणापेक्षा सारथी संस्थेचीच चर्चा जास्त होताना दिसते. मुळातच सारथीसाठी सरकारकडे मागण्या कराव्या लागणे हा समाजाचा अपमान आहे. सारथीला मदत करणे हे राज्य सरकारचे दायित्वच होते, पण सरकार तिथेही कमी पडले. सारथी सक्षम करायची असेल तर या संस्थेला आता अभिमत विद्यापीठाच्या धर्तीवर पुढे घेऊन जावे लागेल. आंतराष्ट्रीय विद्यापीठांशी करार करून नव्या जागतिक दर्जाच्या संधी मराठा समाजातील विद्यार्थ्याना करून दिल्यास सारथीचा विकास होवू शकेल. त्यातून या संस्थेचा राजकीय वापर थांबेल,’ असे विखे म्हणाले होते. त्यासंबंधी प्रतिक्रिया देताना संभाजीराजे यांनी विखेंना टोला लगावला आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times