मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री () यांच्या नातेवाईकांच्या ताब्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) जप्तीची कारवाई केली आहे. त्यामुळं त्यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा असतानाच आता भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व कर्जत-जामखेडचे आमदार () यांच्याही चौकशीची मागणी केली आहे.

भाजपचे माजी खासदार () यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावरील कारवाईचं स्वागत केलं आहे. त्याचबरोबर, त्यांनी रोहित पवार यांच्यावरही कारखाना लाटल्याचा आरोप केला आहे. कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी-विक्री प्रक्रियेचीही ईडीनं चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो लिमिटेड या कंपनीनं कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या खरेदीत घोटाळा केला आहे. या कारखान्याची प्रत्यक्ष किंमत कितीतरी जास्त होती, मात्र रोहित पवारांनी घोटाळा करून हा कारखाना अवघ्या ५० कोटी रुपयांना विकत घेतला आहे. पवार कुटुंबानं असे अनेक कारखाने लाटले आहेत. त्यामुळं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं मोठं नुकसान झालं आहे. या घोटाळ्याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

सक्तवसुली संचालनालयानं सातारा येथील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मालमत्ता सील केल्या आहेत. हा कारखाना अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकांचा आहे. या कारखान्यानं राज्य सहकारी बँकेचं कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. त्याच अनुषंगानं ईडीनं कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. हा कारखाना आधी सहकारी स्वरुपाचा होता. मात्र, नंतरच्या काळात त्याची विक्री होऊन खासगीकरण झालं होतं. हे प्रकरण पुढं आल्यानंतर आता भाजपनं पवार कुटुंबावर आरोप सुरू केले आहेत.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here