यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. विविध सामाजिक संघटनांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर विविध स्तरांतून त्यांना पाठिंबाही मिळत आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी समितीनं त्यांना नोटीसही बजावली होती. त्याला इंदोरीकरांनी उत्तरही दिलं आहे. दुसरीकडे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून त्यांना पाठिंबा दिला जात असला तरी, अशा प्रकारच्या वक्तव्याचं समर्थन करता येत नाही, असं काही नेत्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे. तसंच काल, मंगळवारी भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नगरमध्ये येऊन पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसंच येत्या दोन-तीन दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा दिला होता. त्यानंतर आज, इंदोरीकर महाराजांकडून जिल्हा आरोग्य विभागानं पाठवलेल्या नोटिशीला उत्तरही देण्यात आलं आहे. पण त्यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलं आहे, हे अद्याप समजू शकलं नाही.
इंदोरीकरांच्या वक्तव्याबाबत भाजपचे आमदार आणि नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंदोरीकर महाराजांविषयी मला नितांत आदर आहे. त्यांचे सामाजिक प्रबोधनाचे काम खूप मोठे आहे. मात्र, प्रबोधन करताना त्यांनी थोडा संयम ठेवायला हवा. त्यांचा देवच त्यांच्या पाठिशी उभा राहील, असं विखे-पाटील म्हणाले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times