मुंबईतील टिळक भवन येथे ते पत्रकारांशी बोलत होते. सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीनं जप्ती आणली आहे. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा आहे. त्याचप्रमाणे, महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांच्या व मंत्र्यांच्या मागेही ईडीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. त्यावरून पटोले यांनी भाजपवर जोरदार तोफ डागली. ‘जो भाजपमध्ये प्रवेश करतो, त्याची सर्व पापं धुतली जातात आणि जे विरोधी पक्षात आहेत, त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला जातो, हे लोकशाहीसाठी घातक आहे, असं ते म्हणाले.
राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपचं राजकारण
विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राज्यपालांच्या मार्फत पत्र पाठवण्याच्या भाजपच्या कार्यपद्धतीचाही पटोले यांनी समाचार घेतला. ‘विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशानात व्हावी ही महाविकास आघाडीचीही इच्छा आहे. परंतु या मुद्द्यावरून भाजप राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करतोय. त्यांच्या राजकारणाला आम्ही भीक घालत नाही. आमदारांच्या कोविड चाचण्या झाल्यानंतरच पुढील परिस्थिती स्पष्ट होईल. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे मांडलेली भूमिका योग्यच आहे, त्यात चुकीचे काही नाही, असं पटोले म्हणाले.
वाचा:
विधानसभेचा अध्यक्ष हा काँग्रेस पक्षाचाच होणार, त्यावर महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस पक्ष आपल्या आमदारांची मतं जाणून घेऊन पक्षश्रेष्ठींना कळवेल आणि अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर होईल. आघाडीतील तिन्ही पक्षांचा आपापल्या आमदारांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे संख्याबळ कमी होईल म्हणून व्हीप काढला हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. व्हीप काढणे ही एक व्यवस्था आहे, त्यात वावगे काही नाही,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.
केंद्राचे कृषी कायदे राज्यात लागू होणार नाहीत!
‘केंद्र सरकारनं आणलेल्या तीन काळ्या कायद्यांना आमचा विरोध आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून फूलप्रुफ कायदा व्हावा ही काँग्रेससह महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. तीच भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही आहे. केंद्राचे कृषी कायदे राज्यात लागू होणार नाहीत. राज्य सरकार आपला कायदा बनवेल. त्यासाठीचा मसुदा जनतेसमोर ठेवून शेतकऱ्यांची व जनतेची मतं मागवली जातील आणि त्यातून कायदा बनवला जाईल,’ असं पटोले म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times