मुंबई : उज्‍जीवन स्‍मॉल फायनान्‍स बँकेने आज उपलब्‍ध करून देणारी आघाडीची डिजिटल कर्जदाता लोनटॅपसोबत धोरणात्‍मक सहयेागाची घोषणा केली. हा सहयोग उज्‍जीवन एसएफबीच्‍या एपीआय बँकिंग उपक्रमाचा भाग आहे, ज्‍याच्या माध्‍यमातून १५० हून अधिक एपीआय उपलब्‍ध असून फिनटेक्‍सना डिजिटल कर्ज सुविधा व डिजिटल दायित्‍व, पेमेण्‍ट्स इत्‍यादी सुविधा देण्‍यासाठी जलद व सुरक्षित सहयोग देत आहेत.

या सहयोगाबाबत बोलताना उज्‍जीवन स्‍मॉल फायनान्‍स बँकेचे डिजिटल बँकिंग प्रमुख धीमंत ठक्‍कर म्‍हणाले,”फिनटेक्‍ससोबतचे असे सहयोग आम्‍हाला आमची उत्‍पादने व सेवा अधिक संभाव्‍य ग्राहकांना उपलब्‍ध करून देण्‍यामध्‍ये मदत करतील. आम्‍हाला लोनटॅपच्‍या डिजिटल व्‍यासपीठाच्‍या माध्‍यमातून आमच्‍या वैयक्तिक कर्ज ऑफरिंगमध्‍ये वाढ करण्‍याचा आनंद होत आहे. हा सहयोग वैयक्तिक कर्ज घेणा-या ग्राहकांना सोयीसुविधा देईल, ज्‍यामुळे एकूण प्रक्रिया जलद व एकसंधी होईल.”

पर्सनल लोन्‍सचे व्‍यवसाय प्रमुख मनिष कुमार राज म्‍हणाले,”डिजिटल सहयोग धोरणात्‍मकरित्‍या महत्त्वाचे आहेत, कारण यामुळे ग्राहकांचा वैविध्‍यपूर्ण समूह उपलब्‍ध होतो. सारख्‍या डिजिटल कर्जदात्यांसोबतचा आमचा सहयोग आम्‍हाला आमची पोहोच वाढवण्‍यामध्‍ये साह्य करेल.”

लोनटॅपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमित तिवारी म्‍हणाले,”लोनटॅपमध्‍ये आमचा लोकांना आर्थिक स्‍वावलंबतेसह त्‍यांचे जीवन सक्षम करण्‍यामध्‍ये साह्य करण्‍याचा मनसुबा आहे. आमचा विश्‍वास आहे की, पगारदार समूहाला त्‍यांच्‍या आवश्‍यकतांनुसार वैयक्तिकृत कर्ज ऑफरिंग्‍जचा लाभ होईल. स्थिर व जलद कर्ज ऑफरिंग्‍ज कर्जासंबंधित संकोच दूर करतील आणि ग्राहकांना कोणतीही चिंता न करता कर्ज प्रक्रियेमध्‍ये सामावून जाण्‍यास प्रोत्‍साहित करतील. हा सहयोग आम्‍हाला अधिकाधिक युजर्सपर्यंत पोहोचण्‍यामध्‍ये सक्षम करेल आणि लोकांना अधिक स्‍वावलंबीपणे जीवन जगण्‍यामध्‍ये साह्य करेल. लोनटॅपने आतापर्यंत त्‍यांच्‍या व्‍यासपीठावर ३२ हजारांहून अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे. उज्‍जीवन एसएफबी लोनटॅप व्‍यासपीठावर १ लाख रूपयांपासून १० लाख रूपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देते आणि अधिकतम मुदत ४८ महिने आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here