मुंबई : राज्यातील करोना रुग्णसंख्या वाढीचं प्रमाण गेल्या काही दिवसांपासून स्थिर झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज राज्यात ८,७५३ नवीन रुग्णांचं निदान झालं आहे, तर ८,३८५ रुग्ण करोना विषाणूला हरवून घरी परतले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण ५८,३६,९२० करोनाबाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०१ टक्के एवढे झाले आहे. मात्र आज १५६ करोना बाधितांना आपला जीव गमवावा लागला. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे.

राज्यात आजपर्यंत किती जणांना करोनाने गाठलं?
राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२०,९६,५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,७९,३५२ (१४.४४ टक्के) नमने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात ६,२४,७४५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४,४७२ व्यक्ती सांस्थातमक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोणत्या भागात करोनाचा प्रादुर्भाव जास्त?
खरंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये करोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र आहे. केवळ ६ जिल्ह्यांमध्ये करोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ आकडी आहे. यामध्ये मुंबई (१२९०५ रुग्ण), ठाणे (१६३३९ रुग्ण), पुणे (१७०१३ रुग्ण), सांगली (१०९९९ रुग्ण) आणि कोल्हापूर (१२७६७ रुग्ण) या जिल्ह्यांचा समावेश आहे. याखालोखाल रायगडमध्ये ५२१२, रत्नागिरीत ५४१६, सिंधुदुर्गात ४२०६, साताऱ्यात ७७७४, नाशिक इथं ३३५९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यभरात सर्वत्र करोना रुग्णसंख्या घटत असली तरीही करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने प्रशासन सावध भूमिकेत आहे. त्यामुळे अनेक भागांत अद्यापही निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आले नाहीत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here