नवी दिल्लीः गुजरातमधील व्यावसायिक संदेसरा बंधुंनी १४,५०० कोटींचं बँकेचं कर्ज थकवून फकवणूक केल्याप्रकरणी ( ) या संबंधित एका प्रकरणात ( ) आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या जावयाची ( ) कोट्यवधींची मालमतात जप्त करण्यात आली आहे. मनी लॉड्रींग संबंधी चौकशी केल्यानंतर संदेसरा बंधुंनी आणि इरफान सिद्दीकीदरम्यान आर्थिक लेनदेन झाल्याचं समोर आलं आहे. यात अभिनेता डिनो मोरियाही सामील असल्याचं तपासात समोर आलं. ज्या रकमेचा गैरव्यवहार झाला आहे, तेवढ्याच रकमेची मालमत्ता जप्त केली गेली आहे, असं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं.

या प्रकरणात कथितरित्या बँकेची १४, ५०० कोटींच्या कर्जाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी स्टर्लिंग बायोटेक आणि याचे मुख्य प्रवर्तक आणि संचालकांपैकी नितीन जयंतीलाल संदेसरा, चेतनकुमार जयंतीलाल संदेसरा आणि दीप्ती संदेसरा हे गायब आहेत. नितीन आणि चेतनकुमार हे संदेसरा बंधु २०१७ मध्ये इतरांसोबत भारतातून पळून गेले होते.

पंजाब नॅशनल बँकेची १३, ४०० कोटींची फसवणुकीच्या घोटाळ्याहूनही हा बँक घोटाळा मोठा आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेची फसवणू केली. दुसरीकडे संदेसरा कुटुंबाची सीबीआय आणि आयकर विभागाकडून चौकशी केली गेली. राजकारणातील बड्या नेत्यांशी संबंध, भ्रष्टाचार आणि कर चोरी प्रकरणी संदेसरा कुटुंबीयांची वेगवेगळी चौकशी झाली आहे.

काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता डिनो मोरिया आणि संजय खान यांच्यासह डीजे अकील यांची मालमत्ता गुजरातमधील औषध कंपनी स्टर्लिंग बायोटेक समूहाशीसंबंधीत प्रकरणी जप्त करण्यात आली आहे. PMLA नुसार चार जणांची मालमत्ता जप्त करण्याचे प्राथमिक आदेश जारी करण्यात आले आहेत. मालमत्ताचे किंमत ही ८.७९ कोटी रुपये आहे. हा घोटाळा जवळपास १६ हजार कोटी रुपयांहून अधिकचा आहे. त्यापैकी १४ हजार ५१३ कोटी रुपयांची मालमत्ता ‘ईडी’ने आतापर्यंत मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत जप्त केली आहे.

जप्त करण्याय येत असलेल्या मालमत्तेत खानची मालमत्ता ही तीन कोटी, डिनो मोरियाची १.४ कोटी आणि डिजे अकीलची १.९८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तर अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दीकी यांच्या २.४१ कोटींच्या मालमत्तेचा यात समावेश आहे. संदेसरा बंधुनी गैरव्यवहारातील काही संपत्ती ही या चार जणांना दिली, असं ईडीने म्हटलं आहे. संदेसरा बंधुंना विशेष कोर्टाने फरार घोषित केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here