राहुल म्हणाला की, माझ्यासाठी कर्णधार म्हणजे धोनी. धोनीने अनेक ट्रॉफी जिंकल्या आहेत, पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्यातील नम्रता आणि शिस्त. जर कोणी कर्णधार हा शब्द उच्चारला तरी आमच्या पिढीतील पहिले नाव पुढे येईल ते म्हणजे महेंद्रसिंह धोनी. आम्ही सर्व त्याच्या नेतृत्वात खेळलो आहोत तसेच बर्याच ट्रॉफी जिंकल्या आहेत, पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की, प्रत्येकजण त्याचा आदर करतो. तो आपल्या कारकिर्दीतील चढ-उतारात नेहमी नम्र राहिला आहे. देशासाठी अनेक गोष्टी त्याने मिळविल्या आहेत. कर्णधार म्हणून त्याने संघातील खेळाडूंचा सन्मानही केला, त्यामुळे इतर सर्व खेळाडू त्याचा आजही आदर करतात. आम्ही कोणताही विचार न करता त्याच्यासाठी बुलेट (बंदुकीची गोळी) खाऊ शकतो.
धोनी माझा आयडॉल
कोट्यवधी क्रिकेटपटूंप्रमाणेच के.एल. राहुलही धोनीला आयडॉल मानतो. राहुल जेव्हा तरुण होता, तेव्हा त्याने धोनीला त्याचे प्रेरणास्थान मानले. राहुलने याआधी एका मुलाखतीत म्हटले होते की, जेव्हा झारखंडमधील एका छोट्या गावातून आलेला मुलगा टीम इंडियाचा कर्णधार बनू शकतो, तर आपणही एक दिवस टीम इंडियाचा भाग होऊ शकतो. राहुलने धोनीच्याच नेतृत्वात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट कारकीर्दीची सुरवात केली होती. आज तो भारताचा स्टार फलंदाज आहे. तसेच आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधारही आहे.
इंग्लंड दौर्यात बजावू शकतो महत्वाची भूमिकासध्या राहुल इंग्लंड दौर्यावर असून तो भारतासाठी मोठी भूमिका बजावू शकतो. 2019 पासून त्याने कसोटी सामने खेळलेले नाहीत, पण शुभमन गिलच्या दुखापतीनंतर आता त्याला अंतिम-11 मध्ये संधी मिळू शकते. राहुलने 36 कसोटी सामन्यांमध्ये 34.58 च्या सरासरीने 2006 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 5 शतके आणि 11 अर्धशतकेही झळकावली आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times