म. टा. वृत्तसेवा, वसई:
माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे येथील पंचतारांकित बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी ‘लश्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेनं मेलद्वारे दिली आहे. या धमकीच्या मेलनं एकच खळबळ उडाली. या क्लबच्या अधिकृत मेल आयडीवर मेल पाठवून धमकी दिली आहे. क्लब वाचवायचा असेल तर, २४ तासांच्या आत ७ कोटी रुपये खात्यावर जमा करा, असंही मेलमध्ये म्हटलं आहे.

सेव्हन इलेव्हन क्लबच्या अधिकृत इ-मेल आयडीवर वर बुधवारी सकाळी ‘लश्कर ए तोयबा’मार्फत मेल आल्याची माहिती माजी आमदार मेहता यांनी दिली. या मेलच्या माध्यमातून सात कोटींची मागणी केली आहे. जर २४ तासांच्या आत ७ कोटींची मागणी पूर्ण केली नाही; तर बॉम्बस्फोट घडवून आणू. यासाठी आम्ही शहीद व्हायला तयार आहोत, तसेच आमच्यासोबत तिथल्या लोकांचाही जीव घेऊ, त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल, असा मजकूर या मेलमध्ये आहे. यानंतर मेहता यांनी तात्काळ याबाबत मिरारोड पोलिसांना माहिती दिली. त्यांनी तक्रार नोंदवून घेत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर तातडीनं संपूर्ण क्लब रिकामा केला असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. क्लबची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. सध्या क्लबचा ताबा पोलिसांनी घेतला असून, क्लबचे सर्व प्रवेशद्वार बंद केले आहेत. ‘क्लबची तपासणी करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे, असे उपविभागीय पोलीस अधीक्षक शांताराम वळवी यांनी सांगितले.

या मेल बाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून, हा मेल कितपत खरा आहे?, मेल नक्की कोठून आला आहे याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच बुधवारी पोलीस तपासासाठी हा क्लब बंद आहे, मात्र गुरुवारपासून हा क्लब नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे, असं मेहता यांनी सांगितलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here