वाचा:
जळगाव जिल्ह्यात करोना संसर्गाची दुसरी लाट फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाली. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात पुन्हा संसर्ग वाढायला सुरुवात झाली. त्यानंतर मार्च व एप्रिल महिन्यात संसर्गाने उच्चांक गाठला होता. या दोन महिन्यांत दररोज हजारावर नवीन बाधित रुग्ण आढळत होते. त्यामुळे आरोग्य सुविधांचा देखील तुटवडा जाणवायला लागला होता. विशेष म्हणजे करोना बाधितांचा आकडा वाढत असताना बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील मार्च व एप्रिल महिन्यात लक्षणीय झाले होते.
मे महिन्यापासून घटली रुग्णांची संख्या
मार्च व एप्रिल महिन्यात जळगाव जिल्ह्यात करोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्यानंतर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून घटण्यास सुरुवात झाली. दररोज आढळणाऱ्या नवीन बाधितांची संख्याही कमी होत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत गेली. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येचा आलेखही खाली आला. मे महिन्यात जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या दहा हजार पेक्षा जास्त होती. मात्र, मे महिन्याच्या अखेरपर्यंत घटून ती साडेपाच हजाराच्या टप्प्यात आली. त्यापाठोपाठ आलेला जून महिना देखील जळगाव जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला. जून महिन्याच्या अखेर साडेपाच हजारावर असलेली सक्रिय रुग्णसंख्या सहाशे पर्यंत खाली आली आहे.
वाचा:
जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात करोना संसर्गाने उच्चांक गाठला असताना हे करोना संसर्गाचा हॉटस्पॉट ठरले होते. जळगाव शहरातील सक्रिय रुग्णसंख्येत देखील जून महिन्यात मोठी घट झाली. गुरुवारी (दि.१ जुलै) जळगाव शहरात एकही करोना रुग्ण आढळला नाही. जळगाव शहरात सध्या फक्त ५४ सक्रिय रुग्ण आहेत.
जळगाव जिल्हा
आतापर्यंतचे एकूण रुग्ण- १ लाख ४२ हजार ३२१
बरे झालेले रुग्ण- १ लाख ३९ हजार १३८
एकूण सक्रिय रुग्ण- ६१२
बाधित रुग्णांचा मृत्यू- २५७१
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times