: स्वतःच्या नातीवर बलात्कार करून रक्ताच्या नात्याला काळीमा फासण्याऱ्या नराधम आजोबास २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी आजोबा नामदेव विठोबा जाधव (वय ६५) याला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. एम. चंदगडे यांनी सुनावली. बलात्कार व बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कलमानुसार ही सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलीचे कुटुंबीय जालना येथून शिराळा परिसरात ऊस तोडणीसाठी आले होते. २० डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १० च्या सुमारास पीडित मुलीचे आई-वडील ऊस तोडणीसाठी गेले होते. तीन लहान मुलांची जबाबदारी त्यांनी आजोबा नामदेव जाधव याच्यावर सोपवली होती. रात्री ८ च्या सुमारासा धुमाळवाडी येथे असणाऱ्या खोपीमध्ये नामदेव जाधवने ५ वर्षे वयाच्या नातीवर लैंगिक अत्याचार केला.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० च्या सुमारास सर्व कुटुंब दुसऱ्या गावी ऊस तोडीसाठी निघाले असताना पीडित मुलीने तिला त्रास होत असल्याची माहिती आईला दिली. २२ डिसेंबरला पीडित मुलीला घेऊन आई-वडील दवाखान्यात गेले त्यावेळी मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

कोल्हापूर येथील वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची फिर्याद कोडोली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. पीडित मुलीच्या वडिलांनी विचारणा केल्यानंतर आजोबांनीच नातीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

याप्रकरणी कोर्टात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी, वडील, पीडित मुलगी, मुलीची आई, पंच, मेडिकल ऑफिसर व तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायमूर्ती चंदगडे यांनी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमानुसार आरोपीस २० वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here