देहरादूनमध्ये केंद्रीय मंत्री , भाजपचे प्रदेश प्रभारी दुष्यंत गौतम यांच्या उपस्थितीत विधिमंडळाच्या या बैठकीत नव्या नेत्याची निवड केली जाणार आहे.
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा सहा महिन्यांत राजीनामा
उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांनी शुक्रवारी रात्री पदाचा राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे सुपूर्द केला. रावत हे गेले तीन दिवस दिल्लीत होते. गृहमंत्री , जे. पी. नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. त्यानंतर शुक्रवारी रात्री त्यांनी नड्डा यांची भेट घेऊन राजीनामा दिला.
रावत हे खासदार असून, त्यांची सहा महिन्यांपूर्वी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती. १० सप्टेंबरपूर्वी रावत यांना विधानसभेवर निवडून येणे आवश्यक होते; मात्र वर्षभरातच विधानसभेची निवडणूक होणार असल्याने निवडणूक आयोग पोटनिवडणूक घेण्याची शक्यता कमी होती. त्यामुळेच पक्षनेतृत्वाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे राजकीय निरीक्षकांचं मत आहे.
उत्तराखंडातील ७० विधानसभा मतदारसंघांपैंकी ५७ जागा भाजपकडे आहेत. यातील भाजपची गंगोत्रीची एक जागा सध्या रिक्त आहे.
कुंभमेळ्याआधी त्रिवेंद्र सिंह रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर वरिष्ठांच्या आशीर्वादानं याच वर्षी मार्च महिन्यात हे पद तीरथ सिंह यांना मिळालं होतं. रावत यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times