दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे ७३८ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ०१ हजार ०५० वर पोहचलीय.
शुक्रवारी ५७ हजार ४७७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ९६ लाख ०५ हजार ७७९ वर पोहचलीय.
भारतात तब्बल ९७ दिवसानंतर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पाच लाखांहून कमी झाल्याचं समोर येतंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील अॅक्टिव्ह रुग्णांचा दर १.६२ टक्के आहे. वाढून ९७.०६ टक्क्यांवर तर दैनिक २.३५ टक्के आहे.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी ०५ लाख ०२ हजार ३६२
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ९६ लाख ०५ हजार ७७९
- उपचार सुरू : ४ लाख ९५ हजार ५३३
- : ४ लाख ०१ हजार ०५०
- करोना लसीचे डोस दिले गेले : ३४ कोटी ४६ लाख ११ हजार २९१
लसीकरण मोहीम
देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण ३४ कोटी ४६ लाख ११ हजार २९१ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील ४३ लाख ९९ हजार २९८ लसीचे डोस शुक्रवारी एकाच दिवसात देण्यात आलेत.
भारतात पार पडलेल्या चाचण्या
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै २०२१ पर्यंत देशात एकूण ४१ कोटी ६४ लाख १६ हजार ४६३ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. यातील १८ लाख ७६ हजार ०३६ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात करण्यात आली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times