नवी दिल्ली : न्यूझीलंडच्या दोन वेगवान गोलंदाजांनी क्रिकेटविश्वात नव्या इतिहासाची नोंद केली आहे. एकाच देशाच्या दोन गोलंदाजांनी एकाच दिवशी हॅट्ट्रिक घेण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने टी-20 ब्लास्टमध्ये हॅट्ट्रिक विकेट घेत इतिहास रचला. यॉर्कशायरने लँकशायरविरुद्ध 9 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात लॉकी फर्ग्युसनने 24 धावांत 4 गडी बाद केले. त्याने घेतलेल्या हॅट्ट्रिकचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करण्यात आला आहे.

शेवटच्या षटकात 20 धावांचा बचाव लॉकी फर्ग्युसनला करायचा होता. पण त्याची सुरुवात चांगली झाली नव्हती. पहिल्या 3 चेंडूत त्याने 10 धावा दिल्या. उरलेल्या 3 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता होती. पण फर्ग्युसनने ल्यूक वेल्सची विकेट घेत कमाल अॅडम लिथने त्याचा शानदार झेल घेतला. त्यानंतर फर्ग्युसनने ल्यूक वुडचा त्रिफळा उडवला. हॅटट्रिकवर आला होता. टॉम हार्टलेला बाद करून त्याने आपली हॅटट्रिक पूर्ण केली. यावेळीही अॅडम लिथनेच झेल घेतला.

मिल्नेचीही कमाल लॉकी फर्ग्युसनशिवाय न्यूझीलंडच्या आणखी एका खेळाडूने हॅट्ट्रिक विकेट घेतल्या. त्याचं नाव अॅडम मिल्ने. कॅन्टचा वेगवान गोलंदाज मिल्नेने शेवटच्या षटकात हॅट्ट्रिक विकेट घेतली. मिल्नेला शेवटच्या षटकात 18 धावांचा बचाव करायचा होता आणि त्याने त्याचे काम चोख पार पाडले. शेवटच्या तीन चेंडूंवर मिल्नेने ओली पोप, कायले जेमिसन आणि इवांस यांना तंबूत माघारी पाठवत हॅट्ट्रिक केली आणि संघाला विजय मिळवून दिला. मिल्नेने कॅन्टकडून तर फर्ग्युसनने यॉर्कशायरकडून खेळताना हा कारनामा केला. मिल्ने आणि फर्ग्युसन हे दोघेही न्यूझीलंडचे भरवशाचे वेगवान गोलंदाज आहेत. शेवटच्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर दोघांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here