लंडन : भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा मैदानात आक्रमक फलंदाजी करत असतो, पण मैदानाबाहेर मात्र आता त्याच्यावर त्याची पत्नी रितिका चांगलीच भडकलेली पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर रागाच्या भरात तिने एक कमेंटही केली आहे.

रोहित शर्मा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर बायो-बबलमधून बाहेर आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला सुरू होण्यास अजून एक महिना वेळ असल्याने रोहित सध्या पत्नी रितिकासोबत इंग्लंडमध्ये सुटट्यांचा आनंद घेत आहे. हे जोडपे आपले फोटो सोशल मीडियात शेअर करत असतात. रोहितपेक्षा रितिका ही सोशल मीडियात जास्त अॅक्टिव्ह असते. आताही तिने एक फोटो तिच्या सोशल मी़डिया अकाउंटवरून शेअर केला असून त्याची चर्चा होत आहे.

रितिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला असून तिने रोहितला ट्रोल केले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये रितिका हसताना दिसत आहे, तर रोहित मख्ख खांबासारखा उभा असल्याचे दिसून येतो. रोहितचा हा लूक रितिकाला आवडला नसल्याने तिला राग आला आहे. हा फोटो शेअर करत रितिकाने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, कुणीतरी त्यांना सांगा की, हसणे छान असते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे आपल्या पत्नीसमवेत इंग्लंडमध्ये एन्जॉय करताना दिसले. 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना आणि कसोटी मालिकेतील अंतर लक्षात घेत भारतीय संघातील खेळाडूंची बायो-बबलमधून 20 दिवसांसाठी सुटका करण्यात आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला.

फलंदाजीमध्ये रोहितची कामगिरीही खास नव्हती आणि तो संघाला मजबूत सुरुवात करून देण्यातही अपयशी ठरला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आता रोहित भारताच्या डावाची सुरवात कशी करतो, याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. घरच्या मैदानावर इंग्लंड संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली होती, परंतु इंग्लंडच्या मैदानावर जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचा सामना करणे रोहितसाठी नक्कीच सोपे नसेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here