याबाबत कपिल देव यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, ‘आपला भारतीय संघ नेहमी उपांत्य आणि अंतिम सामन्यापर्यंत पोहोचतो हे काही कमी महत्त्वाचे आहे का? पण भारतीय लोक लगेच टीका करण्यास सुरवात करतात. प्रत्येकवेळी स्पर्धा जिंकणे शक्य नाही. भारतीय संघाने चांगली कामगिरी केली ते पाहा. अंतिम आणि उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यानंतर आपण दबाव पेलू शकत नाही? असं म्हणणं किती योग्य आहे? असा सवालही त्यांनी टीकाकारांना विचारला आहे.
कपिल देव पुढे म्हणाले की, 2014 पासून 2021 पर्यंत भारतीय संघाने निश्चितपणे प्रत्येक आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत माजल मारली आहे. 2015ची विश्वचषक स्पर्धा, 2016ची टी-20 आणि 2019च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने धडक मारली होती. 2014चा टी-20 विश्वचषक, 2017ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ उपविजेता ठरला.
62 वर्षीय कपिल देव म्हणाले की, ‘तो दिवस प्रतिस्पर्धी संघाचा होता, त्यांनी चांगला खेळ खेळला. पण पराभव आपण लगेच गांभीर्याने घेतो. जर एखाद्या सामन्यात कामगिरी खराब झाली, तर माध्यमांत ते शंभरवेळा दाखवले जाते. अशा प्रकारच्या दबावामुळेही आपण आणि इतर प्रतिस्पर्धी संघांनी अनेक सामने जिंकले आहेत, हेदेखील जाणून घेतले पाहिजे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times