गडचिरोली : केंद्र शासनाच्या गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शनिवार 3 जुलै रोजी राज्यव्यापी जन आक्रोश आंदोलन छेडण्यात आले आहे. गडचिरोलीच्या गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार धर्मराव बाबा आत्राम व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व मोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करून निषेध नोंदविला.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम यांच्या नेतृत्वात महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून भाकरी थापल्या आणि गॅस व दुचाकी वाहनांना फुलांचा हार चढवून प्रतिकात्मक स्वरूपात गॅसला तिलांजली वाहिले. दिवसेंदिवस गॅस व इंधनचे दरवाढ होत असून पेट्रोल-डिझेलचे दर तर उच्चांक गाठले आहे.

यासाठी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोवऱ्यावर चूल पेटवून भाकरी थापून स्वयंपाक बनविले. गॅस, इंधन दरवाढ व महागाई वारंवार भडका घेत असल्याने केंद्र शासनाच्या विरोधात निषेध नोंदवून संताप व्यक्त केले. उल्लेखनीय म्हणजे गत आठ महिन्यांपासून वारंवार राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षातर्फे गॅस, इंधन, पेट्रोल-डिझेल व केंद्र शासनाशी निगडित असलेल्या तत्सम जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात चूल पेटवून आंदोलन छेडण्यात आले आहे.

मोदी सरकारने तात्काळ गॅस व इंधनाचे दरवाढ कमी न केल्यास अजून मोठ्या स्वरूपात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिले. यावेळी रा.काँ. चे जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, मुख्य सचिव संजय कोचे, विभागीय सचिव सोनालीताई पुण्यपवार, प्रेमीलाताई रामटेके, मनीषाताई खेवले, सारिका गडपल्लीवार, ममता पटवर्धन, सरचिटणीस जगण जांभुळकर, सेवा दल जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे,विठ्ठल निखुले, विनायक झरकर, मुस्ताक शेख, विवेक बाबनवाडे, विजय धकाते, गोकुलदास ठाकरे, कपिल बागडे, इंद्रपाल गेडाम आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेगण उपस्थित होते.

केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तूंना महाग करून नागरिकांची गळचेपी करीत असून गॅस, इंधन दरवाढीमुळे घरगुती अर्थसंकल्प कोलमडत आहे गॅस, इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात केंद्र शासन व मोदी सरकारच्या विरोधात या आधी अनेकदा जिल्हाभर चूल पेटवा आंदोलन करण्यात आले.

महागाईच्या विरोधात पुढे महिला उग्र रूप धारण केले तर देशाची व राज्याची परिस्थिती बिघडून जाईल त्यामुळे केंद्र सरकारने संतापाचा अंत पाहण्यापेक्षा तात्काळ याची दखल घेऊन गॅस, इंधन, पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तूंचे भाववाढ कमी करावे अशी तीव्र व एकमुखी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम यांनी केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here