संसदेच्या स्थायी समितीची बैठक ठरलेली नसतानाही राऊत मुंबईहून दिल्लीला गेले. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणासाठी राऊत दिल्लीला गेले अशा चर्चा सध्या सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपला कोणत्या नेत्यांशी भेटगाठी झाल्या का? असा प्रश्न विचारला असता राऊत यांनी होकार दिला आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये संजय राऊत हे भाजपच्या कोणत्या नेत्यांना भेटले याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण तरीदेखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून महाराष्ट्राबाबत लवकरच महत्त्वाचा निर्णय होईल अशी चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेबद्दलही विलंब झाला आहे अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे.
यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात काय निर्णय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर अनेक आव्हानांना वेग आला होता. या भेटीचा तपशील अद्यापही समोर आलेल नाही. त्यानंतर आता संजय राऊत यांची भेट हा राजकीय प्रश्न आहे. इतकंच नाही तर या भेटीमुळे शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाणार का? अशा चर्चांना देखील आता उघाण आला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times