म. टा. प्रतिनिधी, जळगाव

इंधन दरवाढीच्या () विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (NCP) राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यानुसार आज जळगाव शहरात देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोहाडी पेट्रोलपंपवर आंदोलन करण्यात आले.यावेळी संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पंपावरील () यांची प्रतिमा असलेल्या फलकावर शाई फेकली. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखून धरीत शाई पुसून काढली. आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडला. ( protesters throw ink on pm modi photo in jalgaon)

जळगाव शहरातील मोहाडी रास्त्यावरील पेट्रोलपंपावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. दिवसोंदिवस पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या भावात होणाऱ्या दरवाढीचा यावेळी निषेध करण्यात आला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा’, ‘मोदी हटाओ देश बचाओ’, अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनादरम्यान पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा असलेल्या फलकावर आंदोलकांनी शाई फेकली. ही घटना कळताच आंदोलन ठिकाणीच्या पोलिसांनी त्वरीत धाव घेत कार्यकर्त्यांना दुर करत फलकावरील प्रतिमेवर असलेली शाई पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पुसून टाकली.

क्लिक करा आणि वाचा-

पंतप्रधान मोदींनी आश्वासने पूर्ण करावी अथवा राजिनामा द्यावा

आंदोलनाची भूमिका स्पष्ट करतांना राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी सांगीतले की, गेल्या सहा महिन्यापासून पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल शंभरी पार, गॅस साडेआठशे रुपये असे दर वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले गेले आहे. वाढत्या महामागाईमूळे सामान्य नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. महामागाई, रोजगार कमी करणार, मोफत गॅस आदी भुलथापा देवून मोदी सरकार निवडून आले.

क्लिक करा आणि वाचा-
जनतेला दिलेले आश्वासन पंतप्रधानांनी पुर्ण करावे. त्वरीत ही केलेली दरवाढ कमी करावी. अथवा पंतप्रधानांनी राजीनामा देवून सन्यांस घ्यावा अशी मागणीही अभिषेक पाटील यांनी आंदोलना दरम्यान केली.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

21 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here