मुंबई: शिवसेनेचे नेते, खासदार आणि भाजपचे आमदार यांची भेट झाल्याची बातमी एका मराठी वृत्तवाहिनीवर झळकल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. मात्र, अशी भेट झाली नसल्याचे खुद्द आशीष शेलार यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील वादाच्या बातम्या, ईडीचे छापा सत्र, अलिकडील गुप्त भेटीगाठी आणि राज्यातील सत्तांतराच्या चर्चेमुळे या वृत्ताकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. (the news about the secret meeting between and spread in the political circles but shelar denied it)

खासदार संजय राऊत आणि आमदार आशीष शेलार यांची दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट येथे गुप्त भेट झाल्याची बातमी टीव्ही-९ मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तात त्यांनी या दोन्ही नेत्यांच्या गाड्या एकाच ठिकाणावरून बाहेर पडत असल्याचे दाखवले आहे. या दोन नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
खासदार संजय राऊत आणि आमदार आशीष शेलार हे दोघे मित्र असून ते वरचेवर भेटत असतात, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्याच प्रमाणे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. या दोन नेत्यांची भेट ही राजकीय स्वरूपाची नसावी, तर ती सदिच्छा भेट असावी, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या भेटीत काही राजकीय संदर्भ आहेत का याबाबत पक्षीय पातळीवर माझ्याकडे काही माहिती नसल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले आहे. आमदार आशीष शेलार यांनी या भेटीचा इन्कार केला असला तरी देखील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेटीबाबत अस्पष्ट प्रतिक्रिया दिल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

हे सरकार ५ वर्षे टिकणार- नाना पटोले

राऊत आणि शेलार यांच्या गुप्त भेटीचे वृत्त झळकल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष सोबत आहेत. त्यामुळे हे सरकार ५ वर्षे टिकेल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here