केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांना महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचा कालही विरोध होता, आजही आहे आणि उद्या देखील राहील, अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली. केंद्रीय कृषी कायद्याला विरोध न करता त्यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, असे शरद पवार याचे मत असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्यावर मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
विधानसभेत याविरोधात प्रस्ताव पारित करण्याचे सरकारकडून काम होणार आहे. त्या कायदयांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. ही समिती सर्व गोष्टींचा अभ्यास करेल. त्यानंतर ती समिती शेतकऱ्यांच्या नेत्यांशी बोलेल. त्यानंतर मसुदा तयार करुन शेतकऱ्यांना तो दाखवला जाईल. जो पर्यंत शेतकऱ्यांना मसुदा मंजूर होणार नाही तोपर्यंत सरकार पुढे जाणार नाही, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
क्लिक करा आणि वाचा-
पवारसाहेबांनी पत्रकारांना केंद्र सरकारमधील हालचालींची याबाबतीत माहिती दिली होती. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी त्याचे स्वागत केले म्हणजे तिन्ही कृषी कायद्यांबाबत पवार यांनी सल्ला दिला असा अर्थ होत नाही असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
आमच्या सरकारचा व आमच्या पक्षाचा सुरुवातीपासून आजपर्यंत तिन्ही कृषी कायदयांना कायम विरोध राहिलेला आहे हे पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी अधोरेखित केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times