याबाबत सविस्तर माहिती अशी की, आळेफाटा येथील तक्रारदार याचा मावसभाऊ यांची संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथील पुर्वी वनक्षेत्रात येत असलेली शेतजमीन ही निर्वनीकरण झाले असले बाबतचा अभिप्राय देऊन जिल्हाधिकारी अहमदनगर यांना अहवाल पाठविणे करिता यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे ४० हजारांची मागणी केली होती.
क्लिक करा आणि वाचा-
तक्रादाराने दोन दिवसापूर्वी नाशिक दौऱ्यावर असलेल्या वनराज्यमंत्री दत्तामामा भरणे याना याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ अभिप्राय देणायच्या सूचना केल्या होत्या. मात्र अधिकाऱ्याने लाचेची मागणी कायम ठेवल्याने तक्रारदार यांनी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिलेनंतर आरोपी लोकसेवक विशाल बोराडे यांनी तक्रारदार यांचेकडे आपल्या मूळगावी आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे जाताना आळेफाटा पैसे येथे स्विकारण्याचे मान्य केले.
क्लिक करा आणि वाचा-
आळेफाटा चौकात आयोजित लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष ४० हजार रुपये स्विकरली असता त्यांना रंगेहाथ पकडले. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times