औरंगाबादः ब्लू डर्ट कुरिअरने शहरात आलेल्या पाच तलवारी पुंडलीकनगर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दानीश खान व्यक्तीच्या नावाने आलेले हे पार्सल पोलिसांनी त्याच्या हातात पडण्यापूर्वीच जप्त केले असून आरोपी दानिश खानचा शोध सुरु केला आहे. (five seized by the police in )

शहरात ब्लू डर्ट या कुरिअर सेवेने शहरात तलवारीचा बॉक्स आला असल्याची माहिती पुंडलीकनगर पोलिस निरिक्षक घनशाम सोनवणे यांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त दिपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस यंत्रणा कामाला लागली. दुपारी दिड वाजेच्या सुमारास सिडको एन-४ येथील मंदीरासमोर कुरिअरच्या वाहनाला थांबवून पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी एका बॉक्समध्ये मॅनसह पाच तलवारी आढळून आल्या.

क्लिक करा आणि वाचा-
या तलवारी अरमान एन्टरप्राईज, ७० इंद्रजित कॉलनी, ए. एस. आर. या ठिकाणाहून दानिश खान याच्यासाठी आल्याचे दिसत आहे. बीलावर दानिशचा क्रमांक दिलेला आहे. कुरिअर बॉय प्रकाश वाढे याने सांगीतले की, दानिश हा वेगवेगळ्या ठिकाणी येऊन पार्सल घेतो, यापुर्वी त्याला पार्सल दिलेले आहेत. अरमान इन्टरप्राईजेसने तलवारीच्या बॉक्सवर वुड हॅण्डक्राफ्ट असे लिहून दिशाभूल केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर जाधव यांच्या तक्रारीवरुन दानिश खान व अरमान इन्टरप्राईजेसच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
पोलिस दानिशचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरिक्षक घनशाम सोनवणे यांनी दिली.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here