मेलबर्न : भारतीय संघाचा सामना करताना ऑस्ट्रेलियाचा संघ कमी पडू शकतो, अशी मन की बात ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी केली आहे. घरच्या मैदानावर भारताविरुद्ध मालिका खेळताना सरावाअभावी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतासमोर दुबळा वाटेल, असे मॉट यांनी म्हटले आहे. 19 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान दोन्ही देशांदरम्यान तीन एकदिवसीय, तीन टी-20 आणि एक कसोटी सामना खेळला जाणार आहे.

मॉट यांनी ‘क्रिकेट.कॉम.एयू’ शी बोलताना म्हटले की, ‘भारत क्रिकेट विश्वामधील एक उदयोन्मुख महासत्ता आहे. त्यांच्याकडे उत्तम खेळाडू आहेत आणि तो एक संघ म्हणून उत्तम प्रतिस्पर्धीही आहेत. सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळत आहेत. त्यामुळे भारतापुढे आम्ही कमजोर ठरू शकतो. कारण आम्ही अलीकडील काही दिवसांत इतके क्रिकेट सामने खेळलेले नाहीत.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. दुसरीकडे भारताच्या शेफाली वर्मा, स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर या खेळाडू ‘द हंड्रेड’ स्पर्धेच्या पहिला हंगामात खेळताना दिसून येतील. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाने एप्रिलपासून कोणत्याही प्रकारचे क्रिकेट सामने खेळलेले नाहीत. तसेच त्यांच्या दहापैकी नऊ खेळाडूंनी ‘द हंड्रेड’ मधून माघार घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक म्हणाले की, ‘सर्व खेळाडूंनी पुन्हा एकत्र येऊन सराव करणे, संघासाठी चांगली गोष्ट ठरेल. यासाठी ब्रिस्बेन येथील नॅशनल क्रिकेट सेंटरमध्ये खेळाडूंसाठी एक शिबिर कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे सर्वत्र लागलेले निर्बंध लवकरात लवकर संपुष्टात यावेत आणि आपण लवकरच कोविडपासून मुक्त होऊ, अशी माझी इच्छा आहे.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here