हा गांजा चंद्रपूर मार्गे नागपूरात येत असल्याची टीप सकाळी पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचत गुप्तरित्या डी. एल. ७ सी. जी. ४३४१ या कारचा पाठलाग केला. बोरखेडी टोलनाक्यावरून ही गाडी पास झाल्याची माहिती मिळताच पोलिस सक्रिय झाले. दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी या गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करीत तिला महामार्गावर रोखले.
कारची डिकी तपासली असता त्यात मोठ्या प्रमाणात गांजा लपवून तस्करी केली जात असल्याचे पोलिसांना दिसले. ग्रामीणचे पोलिस अधिक्षक राकेश ओला, पोलिस अधिक्षक राहूल माकनीकर, उपविभागीय अधिकारी राजेंद्र चव्हाण, पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, उपनिरीक्षक आशिष मोरखेडे यांच्या पथकाने ही सिनेस्टाईल धडक कारवाई केली.
वाचाः
हा गांजा तस्करी करणाऱ्या आस मोहम्मद शकूर (वय २९, रा. विधानपूरा, जिल्हा बागपत, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून जवळपास ३५ पॅकेटमधील ६९ किलो गांजासह १२ लाख ६ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांनी गांजा तस्करीसाठी वापरलेली ५ लाख किमतीची कार, एक मोबाईल आणि रोख एक हजाराची रक्कमही जप्त केली आहे.
वाचाः
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times