या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दिग्दर्शक शंकर यांचे पर्सनल दिग्दर्शक मधु, सहाय्यक दिग्दर्शक कृष्णा आणि एक कर्मचारी चंद्रन यांचा समावेश आहे.
या चित्रपटाचे शूटिंग चेन्नई शहराजवळ सुरू होते. या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कमल हासन यांनी व्यक्त केले दु:ख
या अपघाताबाबत ट्विट करत कमल हासन यांनी दु:ख व्यक्त केले आहे. शूटिंगदरम्यान झालेला अपघात सर्वात भयानक आहे मी माझे तीन सहकारी गमावले आहेत. माझ्या वेदनेपेक्षा
ज्या कुटूंबाने त्यांना गमावले त्या व्यक्तींचे दु: ख अनेक पटीने मोठे आहे. त्यांच्यातीलच एक म्हणून मी त्यांच्या दु: खामध्ये सहभागी आहे
कमल हासन यांनी दुसरे ट्विट करत जखमींबाबत माहिती दिली आहे.मी हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी बोललो आहे. जखमींना तातडीने उपचार देण्यात येत असून त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जात आहेत. जखमी झालेले माझे सर्व सहकारी लवकरच बरे होतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times