या वेब सीरिजमध्ये अरविंद ही सुचीच्या प्रेमात पडतो आणि सुचीला देखील तो आवडू लागतो. ती त्याच्यासोबत श्रीकांतला चीट करते. ज्यामुळे श्रीकांत आणि सुची यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक समस्या येण्यास सुरुवात होते. याबाबत बोलताना शरदनं सांगितलं की, त्याच्या या भूमिकेमुळे म्हणजेच श्रीकांत आणि श्रुती यांच्या नात्यामध्ये आल्यानं त्याला अनेक तिरस्कारांनी भरलेले मेसेज तसेच सोशल मीडियावरून अनेक युझर्स जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत.
शरद म्हणाला, ‘मला रोज मेसेज येत आहेत की, श्रीकांत आणि सुची यांच्यामध्ये आलास तर तुला मारून टाकू. तसेच इतर अनेक धमक्या या वेब सीरिजच्या रिलीजनंतर मला येत आहेत. मला आता याची सवय झाली आहे कारण ही भूमिका मी उत्तम साकारली आहे याचा हा पुरावा आहे.’ दरम्यान अरविंद आणि सुची यांच्यात लोणावळामध्ये असताना काय घडलं याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली मात्र वेब सीरिजमध्ये या दोघांमध्ये नेमकं काय घडलं हे दाखवलेलं नाही त्यामुळे प्रेक्षक केवळ अंदाज लावताना दिसत आहेत.
‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजीच्या दोन्ही सीझनचं दिग्दर्शन राज आणि डीके या जोडीनं केलं आहे. यात मनोज बाजपेयी एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. त्याचं नाव श्रीकांत तिवारी आहे आणि त्याच्या कुटुंबाला तो गुप्तहेर असल्याचं मात्र माहीत नाही. मनोज बाजपेयी व्यतिरिक्त या वेब सीरिजमध्ये शरद केळकर, , समांथा अक्किनेनी, शारिबा हाश्मी, शाहब अली, दर्शन कुमार यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times