मुंबई: बॉलिवूड अभिनेता सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुननं त्याची सावत्र आई श्रीदेवी आणि त्यांच्या मुली जान्हवी आणि यांच्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. याचवेळी त्यानं सावत्र बहिणी जान्हवी आणि खुशी कपूर यांच्यासोबतचं नातं नेमकं कसं आहे यावर अखेर मौन सोडलं आहे. यावेळी अर्जुननं, ‘मी खोटं बोलणार नाही की, सर्वकाही ठीक आहे पण आम्ही दोन वेगवेगळी कुटुंब असून एकत्र चालण्याचा प्रयत्न करत आहोत’ असं म्हटलं आहे.

अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर ही आणि मोना सूरी कपूर यांची मुलं आहेत. मोना आणि बोनी कपूर जेव्हा वेगळे झाले तेव्हा अर्जुन केवळं ११ वर्षांचा होता. मोना यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्याशी लग्न केलं होतं. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी जान्हवी आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. जेव्हा अर्जुन कपूरच्या आईचं अचानक निधन झालं त्यावेळी अर्जुन आणि अंशुला पूर्णपणे एकटे पडले होते. आपल्या आई-वडिलांचं अशाप्रकारे विस्कटलेलं नातं पाहून अर्जुन कपूर मनातून खचला होता.

श्रीदेवी यांचं २०१८ मध्ये अचानक निधन झालं त्यावेळी मात्र मागचे सर्व वाद आणि दुःख विसरून अर्जुननं मोठा भाऊ म्हणून सर्व कर्तव्य पार पाडली होती. एवढंच नाही तर वडील आणि दोन्ही सावत्र बहिणींच्या पाठिशी अर्जुन- अंशुला खंबीरपणे उभे राहिले होते. त्यानंतर ही चारही भावंडं नेहमीच वेगवेगळ्या फॅमिली फंक्शनमध्ये एकत्र दिसली आहेत. अर्जुन कपूरनं तर जान्हवीसोबत करण जोहरच्या शोमध्येही हजेरी लावली होती. मात्र दोन्ही सावत्र बहिणींसोबत अर्जुनचं बॉन्डिंग नेमकं कसं आहे यावर मात्र त्यानं आता प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच एका हिंदी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन म्हणाला, ‘मी अजिबात बोलणार नाही. जर मी म्हणालो की, आम्ही सगळे एक परफेक्ट फॅमिली आहोत तर हे चुकीचं असेल. आजही आम्ही वेगवेगळीच कुटुंबं आहोत. पण आम्ही एकमेकांसोबत चालण्याचा प्रयत्न करत आहोत. जेव्हा आम्ही एकत्र असतो तेव्हा एकमेकांसोबत चांगला टाइम स्पेंड करतो. या व्यतिरिक्त आम्ही एकाच कुटुंबाचा भाग नाही आहोत. मी हे खोटं बोलायचं नाही आमच्यात सर्व काही परफेक्ट आहे. हे परफेक्ट असू शकत नाही कारण आम्ही सध्या तरी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.’

अर्जुन पुढे म्हणाला, ‘आमच्या सर्वांच्याच आयुष्यात एक वाईट काळ आला ज्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो. त्याआधी आम्ही सर्वच विखुरलेल्या तुकड्यांप्रमाणे होतो. जे आता एकमेकांच्या आयुष्यातील उणीवा भरून काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आज आम्ही एकमेकांसाठी खंबीर आधार आहोत. जान्हवी खुशी आम्हाला त्यांच्या जन्मानंतर २० वर्षांनी भेटल्या. मी आज ३५ वर्षांचा आहे. अंशुला २८ वर्षांची आहे. आम्ही आता समजदार आहोत. त्यामुळे लोकांना ज्याप्रकारे अपेक्षित आहे त्याप्रमाणे मिळून- मिसळून राहणं आमच्यासाठी कठीण आहे. कधी कधी सर्वकाही ठीक नसणं सुद्धा चांगलं असते. कारण तेव्हा तुम्ही एकमेकांच्या मतभेदांचाही आदर करता. पण एकप्रकारे आम्ही एकमेकांप्रमाणेच आहोत ज्याचं कारण आमच्या वडिलांचे जीन्स आहेत.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here