स्वप्नील सुनील लोणकर असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. स्वप्नील शिक्षण पूर्ण झाल्यापासून ‘एमपीएससी’च्या परीक्षेची तयारी करत होता. स्वप्नीलच्या आत्महत्येनं त्याच्या आई-वडिलांना मानसिक धक्का बसला आहे. दरम्यान, रोहित पवार यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. तसंच, राज्य सरकारला एक विनंती केली आहे.
रोहित पवारांनी एक ट्वीट केलं आहे. करोनामुळं स्थगित केलेली एमपीएससीची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
वाचाः
स्वप्नीलसोबत नेमकं काय घडलं?
स्वप्नील एमपीएससीच्या २०१९ मध्ये झालेल्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झालेली नव्हती. त्याचबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली. त्यामध्ये पूर्व परीक्षा तो उत्तीर्ण झाला. करोनामुळे मुख्य परीक्षा झालेली नाही. या सगळ्या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिस अधिक तपास करत आहेत.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times