पंतप्रधान मोदींमध्ये हिंमत असेल तर राफेल सौद्यावर पत्रकार परिषद घेऊन आरोपांना आणि त्यासंबंधी प्रश्नांना उत्तरं द्यावीत. राफेलच्या चौकशीवरून संपूर्ण मोदी सरकार गप्प का आहे? असा प्रश्नही खेडा यांनी केला. राफेल विमान सौद्यातील गैरव्यवहारांच्या आरोपांप्रकरणी काँग्रेसने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.
राफेल सौद्यात ज्या देशाला फायदा झाला आहे त्या फ्रान्समध्ये चौकशी सुरू आहे. पण ज्या देशाच्या नागरिकांच्या कराचा पैसा लुटला आहे त्या देशात चौकशी होत नाहीए. राफेल सौद्यात मध्यस्थाला कोट्यवधीची भेट दिली गेली, हे कागदपत्रांवरून उघड होत आहे. आता हे प्रकरण उघड गुपित बनलं आहे, अशी टीकाही खेडा यांनी केली.
राफेल हे एक सर्वोत्तम लढाऊ विमान आहे. त्यामुळेच तत्कालीन यूपीए सरकारने या लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले होते. पण त्यावेळी विमानाची किंमत ५७० कोटी होती. पण मोदी सरकारने ती वाढवून १६७० कोटी केली. यूपीए सरकार १२६ विमानं खरेदी करणार होतं. पण मोदी सरकारने तर ही संख्या कमी करून फक्त ३६ विमानं का केली? असा सवाल खेडांनी केला. केंद्र सरकारने फ्रान्ससोबत करार करत ३६ राफेल विमानांच्या खरेदीसाठी ५९ हजार कोटींचा सौद्या केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times