राहुल गांधींनी काय केलंय ट्वीट?
राफेल प्रकरणी मोदी सरकार JPC च्या चौकशीला का तयार नाही? असा प्रश्न राहुल गांधींनी ट्ववीट केला. या ट्वीटमध्ये राहुल गांधी यांनी उत्तरासाठी चार पर्याय दिले आहेत. दोषी असल्याची भावना, मित्रांना वाचवण्यासाठी आणि JPC ला राज्यसभेची जागा नकोय आणि वरील सर्व पर्याय बरोबर आहेत, असं राहुल गांधींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
राफेल लढाऊ विमान सौद्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राहुल गांधी हे गेल्या काही वर्षांपासून करत आहे. २०१९ च्या लोकसभा निडणुकीत राफेलमधील भ्रष्टाचारावरून राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात ‘चौकीदार चोर है’ असा नारा दिला होता. पण त्यानंतरही निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला.
राफेल विमान खरेदीच्या ५९ हजार कोटींच्या सौद्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि काही जणांना लाभ पोहोचवण्यात आला आहे, असा आरोप आहे. हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याचं सांगत या प्रकरणी चौकशीसाठी फ्रान्समध्ये न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे, असं फ्रान्समधील मीडियापार्ट वेबसाइटने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
राफेल विमान सौद्या प्रकरणी JPC द्वारे चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. राफेल विमान सौद्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून JPC च्या चौकशीतूनच सत्य बाहेर येईल, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. पंतप्रधान मोदींनी या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावेत आणि आपण निर्दोष असल्याचं सिद्ध करावं, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times