मुंबईः सोमवारपासून विधानसभेचे सुरू होत आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनाचा निर्णय घेण्यात आल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रस नेते व यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली असून या मंत्रिमंडळात अध्यक्षपदाच्या नावावर चर्चा करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांची निवड ही होईलच सर्वांना काळजी ही करोनाची आहे. करोना टेस्ट केल्यानंतरच समजू शकेल की किती आमदार या अधिवेशनात उपस्थित राहतात. त्यावरून अध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल निर्णय घेता येईल, असं थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.

कृषी कायद्याबाबत निर्णय होणार?
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यात अनेक त्रुटी आहेत. हे कायदे शेतकऱ्यांसाठी अनुकुल नाहीत. त्यासाठी कायद्यात जे बदल हवेत ते आम्ही करणार आहोत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा होईल व निर्णय होईल, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तसंच, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. शेतकर्यांच्या बाजूनं उभे राहणारे नेते झाले पाहिजेत ही आमची व शेतकऱ्यांची भूमिका आहे. त्यादृष्टीने आम्ही निर्णय घेऊ, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

भाजपची दवाबतंत्राची पद्धत
भाजप केंद्राकडे पत्र पाठवून कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. अशा पद्धतीने दबाव आणून सरकार मधल्या लोकांना अडचणीत आणणे योग्य नाही. दबावतंत्राचा वापर करून भाजप लोकशाहीविरोधी काम करत आहे, असंही थोरात यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here