मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळं आणि आर्थिक परिस्थितीमुळं स्वप्निल सुनील लोणकर या तरुणानं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून या घटनेमुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर आक्रमक झाले आहेत. या तरुणाच्या आत्महत्येला राज्य सरकारचा बेफिकिरपणा जबाबदार आहे, अशी गंभीर टीका भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. इतकंच नाहीतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावर टीका केली आहे.

स्वप्निलच्या आत्महत्येनंतर राजकीय क्षेत्रातूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत. पुण्यातील आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. एमपीएससी संदर्भात राज्य सरकारनं दुर्लक्ष करू नये. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही दीड वर्षे झाले तरी त्या युवकाला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलले अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

दरम्यान, स्वप्निल शिक्षण पूर्ण झाल्यापासून ‘एमपीएससी’च्या परीक्षेची तयारी करत होता. स्वप्नीलच्या आत्महत्येनं त्याच्या आई-वडिलांना मानसिक धक्का बसला आहे. स्वप्निलच्या आत्महत्येनंतर राजकीय क्षेत्रातूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया देत राज्य सरकारला एक विनंती केली आहे. एमपीएससची जी कार्यप्रणाली आहे त्याचं पुनरावलोकन होण्याची आवश्यकता आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

‘ज्या प्रकारे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती होत नाहीत. तिथल्या अनेक जागा रिक्त आहेत. एमपीएससीचे मेंबर्स आपण भरलेले नाहीत. हे योग्य नाही. अत्यंत अपेक्षेने ही तरुण मुलं अशाप्रकारच्या परीक्षा देतात आणि दोन दोन वर्ष मुलाखत होत नाही. तर, मग त्यांना ही निराशा येते,’ असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

‘एमपीएससीला आम्ही स्वायत्तता दिलेली आहे. पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही. त्यामुळं सरकारला देखील आमची विनंती आहे. की एमपीएससीच्या संपूर्ण कारभाराचा पुन्हा आढावा घेऊन, कशाप्रकारे यामध्ये संपूर्ण परिवर्तन करून, याला अधिक आपल्याला कार्यक्षम करता येईल याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here