या मुलींना काही दिवसांपूर्वी फूस लावून पळवून नेण्यात आले होते. या संदर्भात पोलिसांत तक्रार नोंदवली होती. पण पोलिसांनी आरोपीला अटक न करता मोकाट सोडले आणि आरोपीच्या धमकीला बळी पडून मुलींनी आत्महत्या केल्याचा आरोप करत मृत मुलीच्या नातेवाईकांनी केला.
मौजे हरंगुळा येथील गीतांजली बनसोडे (16) व धनश्री क्षीरसागर (19) या दोन मावस बहिणी रोजी घरात नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या पालकांनी लातूर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गावातील पंकज सुतार या तरुणाने मुलींना फूस लावून पळवून नेल्याचा आरोप त्यांनी केला होता.
मुलींच्या नातेवाईकांनी मुलींना शोधण्याची विनंती करण्यासाठी रोज पोलीस ठाण्यात चकरा मारल्या. मुलीचा पत्ता मिळाल्यावर पोलिसांनी मुलींना पुण्याहून आरोपीच्या गाडीत बसवून आणले. “आपणाला पंकज सुतार यानेच फूस लावून पळवून नेले होते. पुण्यामध्ये त्यांनी आमच्यासाठी जॉब शोधला” अशी माहिती त्यांनी पालकाला दिली. मात्र, तिथे मुलींसोबत गैरवर्तन झाल्याचा त्यांचं शोषण झाल्याचा संशय पालकांना आला. त्या संदर्भात पोलिसांमध्ये जबाब नोंदवून त्यांचे मेडिकल करायचे होते.
ही बाब मुलींना समजतातच त्यांनी घरातील एकाच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. भाजपा महिला प्रदेश उपध्यक्ष स्वाती जाधव यांनी या प्रकरणी पोलिसांना जाब विचारत धारेवार धरले. आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला तर रान पेटवन्याचा इशारा त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times